पाहताना तुजकडे मज घाबरावे लागते
भावनांना मग मनीच्या आवरावे लागते..
चारचौघे थबकुनीया पाहती जेव्हा तिला
नीट करुनी ओढणीला बावरावे लागते..
चाल तिरकी वृद्ध करुनी चालतो मुद्दाम जर
वाट सोडा म्हणत तिजला खाकरावे लागते..
लाजलज्जा शरम आता राहिली आहे कुठे
पुरुष जातीलाच धक्के.. सावरावे लागते..
खालमुंडी सरळ जाता होतसे चर्चा किती
सावरूनी नजर तिजला वावरावे लागते..
.
------------------------------------------------
[hakkasathi andolan
divali ank 2018]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा