विठ्ठल विठ्ठल नाम जपूया
विठ्ठल नामस्मरणी रमूयाडोळ्यासमोर सुंदर मूर्ती
हृदयी विराजमान करूया !
टाळमृदुंगाच्या तालावर
भजनामधे रंगूया
तल्लीन होऊन करुनी जागर
कीर्तनात दंगूया
संकटकाळी अपुला त्राता
पंढरीनाथा वंदन करूया !
पांडुरंग तो उभा विटेवर
हात कटीवर दोन्ही
युगे युगेही लोटली किती
दमला नाही अजूनही
सारे प्रदक्षिणा घालूया
विठूचा जयजयकार करूया !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा