‘ बघ पुण्यातले हे खड्डे रे..’


(चाल:  मन पिसाट माझे अडले रे..)

बघ पुण्यातले हे खड्डे रे
थांब जरासा... थांब जरा..


भरधाव वेग वाहनाचा रे
खड्डयात पाय माणसाचा रे
चिखलास दमाने उडवा रे
थांब जरासा... थांब जरा..


ही खाली पँटही ओली
धडपडून वरती केली
शर्टाची बाजू भिजली रे
थांब जरासा... थांब जरा..

नेहमीच असे खणलेले
खड्डयात पुणे रमलेले
खड्डयातच रस्ते हुडकणे रे
थांब जरासा... थांब जरा..
.

२ टिप्पण्या:

  1. उन्हाळ्यात रस्त्यांवरचे डांबर वितळलेले असताना गाड्यांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे खड्डे पडायला सुरवात होते. हे खड्डे मग पावसाळ्यात त्रासदायक ठरतात.

    उत्तर द्याहटवा