स्वातंत्र्याची भीती .....
स्वतंत्र माझा देश जाहला, मी वर्णावा किती ,
इतकी वर्षे झाली , का वाटे स्वातंत्र्याची भीती !
धांगडधिंगा-गदारोळ तो दिसतो टीव्हीवरती,
लोकशाहीचे लक्तर लोंबत हसते वेशीवरती !
हर्ष होतसे बेकारांना, जवळी येता निवडणूक ती
निवडुन येता परि ते नेते कोठे पसार होती ?
कुणीहि परके घरात घुसती, स्वगृह समजून
घातपात अन गोळिबार ते करती, ना लाजून !
फाशी झाली तरि ते जगती, निवांत झोपून
तोड-फोड ती आम्ही पाहतो निद्रानाशातून !
भूखंडातही घोटाळे नि लाचखोरि करि बेजार
महागाई अन स्वाईन-फ्लूचा वाढतसे आजार !
निकालाविना तुंबित खटले पुढे सरकणार ....
कुंठित होते मति- पाहुनी लाल फीत व्यवहार !
अमर जाहले थोर हुतात्मे , झेंडे मग फडकती !
फ्लेक्सावर झळकण्यात नुस्ते गेंडे का गुंगती !!
स्वतंत्र माझा देश जाहला, मी वर्णावा किती ,
इतकी वर्षे झाली, का वाटे स्वातंत्र्याची भीती !

antarmukh karun taaknari hee rachana... aani hey kaay August madhye 6 kavita..??? Great!!!!
उत्तर द्याहटवातुमच्या असल्या कविता वाचून आम्ही टाळ्या वाजवू, पण त्यामुळे आमच्या वागण्यात ढिम्म फरक पडणार नाही. आम्ही याच्या फार पलीकडे जावून पोहोचलो आहोत. गुन्हेगार नटानी कोर्टात कुठल्या रंगाची चड्डी घातली होती, हे आम्ही चवीने बघणार, देहप्रदर्शन करणाऱ्या चवचाल नट्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावणार, आमच्या अजाण बालकांना पैसे मिळवण्यासाठी रियालिटी शो त बीभत्स गाण्यावर हिडीस नाच करायला लावणार. कारण आता एकाच 'मूल्य' आहे - 'पैसा'. आणि एकच नाते - नर आणि मादी.
उत्तर द्याहटवाkd -
उत्तर द्याहटवाpratisaadaabaddal aabhaar . jast kavita vaachoon bare vaatle naa ?
anamit -
parakhad pratikriyebaddal manaapaasoon aabhaar !