1.
'सवय -'
सवय तुला मज डिवचण्याची
दिवसभर दूर दूर पळण्याची -
तास एखादा निवांत पडता
स्वप्नी येउन मज छळण्याची ..
.
2.
'कशासाठी पोटासाठी -'
कधी ह्या कधी त्या दारी
कष्टाविना न मिळे भाकरी -
ह्याला जीवन ऐसे नाव
कधी लाचारी कधी चाकरी..
.
3.
'एखादी तरी स्मितरेषा -'
नका दाखवू चेहरा गंभीर
टाळतील ते सारे जन हो -
ठेवा स्मितरेषा चेहऱ्यावर
भाळतील ते सारे जन हो ..
.
फुलपाखरासारखीच नाजुक कविता !
उत्तर द्याहटवाPranav -
उत्तर द्याहटवाdhanyavaad !