गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ? |१|
मासेभाऊ मासेभाऊ -
नापास झाला का हो ?
रडून रडून सगळा
टँक भरला की हो ! |२|
पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो
एकदा तरी वळून बघाव ? |३|
कासवपंत कासवपंत -
लढायला किती हळू जाता ?
ढाल पाठीवरती घेता
तलवार कुठे विसरता ? |४|
भोलानाथ भोलानाथ -
गुब्बू गुब्बू गुब्बू
पैशाचं मी पेरलं झाड
पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा