(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -)
होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ |
कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
आठवले सारे सारे गहाण ते गाळे
तुज कर्जाचे भय न संगती जा ....
श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी
पूस रे डोळे या सदऱ्याने- पाहुन ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा ...
आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची
जमले तिचे रे कैसे तुजशी लव्ह-लफडे
हटू नकोस आता मागे काम कितीही पडे
नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा ...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा