वृत्त- मंजुघोषा
लगावली- गालगागा गालगागा गालगागा
मात्रा- २१
-----------------------------------------------------
गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला
जाउ दे त्याला किती उंचावरीही
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला
तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला
काल माशी ना उठे नाकावरीची
आज मिरवी शूर नेता गाजलेला
शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला..
.
लगावली- गालगागा गालगागा गालगागा
मात्रा- २१
-----------------------------------------------------
गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला
जाउ दे त्याला किती उंचावरीही
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला
तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला
काल माशी ना उठे नाकावरीची
आज मिरवी शूर नेता गाजलेला
शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा