(चाल: रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...)
लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी
स्वार्थासाठी कायदाही तोडीला
पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ|
नवी कोरी गाडी काळ्या पैशाची
भरली ती भेसळीच्या मालाची
गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू..
जात येत विमानानं देशात, परदेशात
दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात
त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू..
चीड नाही त्यांना देशद्रोहाची
मिरवित शेखी स्विस बँकेची
घोळघालू नाती सारी भूखंडाच्या वाढीला |३| पायबंद घालू..
मस्त विडंबन
उत्तर द्याहटवाअमोल केळकर
http://kelkaramol.blogspot.com
आपल्याकडून प्रतिक्रिया आली , याचा विशेष आनंद होत आहे.
उत्तर द्याहटवाआभारी आहे. वाचत रहा .