"प्रेम"
मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
"बदला"
काल कावळा दारी 'काव'ला
तरी पाहुणा नाही टपकला !
कावळ्या घरी पाहुणे वाढता-
त्याने राग मम दारी काढला ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा