पाहुनिया विठ्ठला आनंदात न्हाऊ |१|
टाळ चिपळ्यांचा घुमवीत नाद
एकमुखे घालू माऊलीस साद |२|
मालदार कोणी झोळीवाला कोणी
पताका उंचावून विठू एक जाणी |3|
जनी नामा गोरा चोखा रोहिदास
नाही दुजाभाव सर्वामुखी घास |४|
ओळख ना पाळख नका दूर लोटू
जीव लावूनिया पंगतीत भेटू |५|
भेटू एकमेका, जाऊ देवळात
संत सज्जनासंगे दंगू कीर्तनात |६|
लोभस मुद्रा कर कटीवर
मूर्ती विठ्ठलाची शांत विटेवर |७|
विठ्ठल विठ्ठल गजर टाळ्यात
चंद्रभागा वाहते माझिया डोळ्यात |८|
विठ्ठल विठ्ठल जप मनीध्यानी
कर्तव्यात लाभ मन समाधानी |९|
.
Kavite itakach Harsh maulincha photo pan atishay sundar ahe...!
उत्तर द्याहटवाJai Hari Vitthal...!
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
उत्तर द्याहटवा