मी माझ्या छंदातच रमतो
मी हा माझा छंदच म्हणतो !
शब्द वेचतो
शब्द वाटतो
आनंद लुटतो
आनंद दाटतो
जमेल त्याला भेटा म्हणतो
स्वत:स बघतो
इतरांना बघतो
एकटा चालतो
चाला म्हणतो
झेपेल तेवढे खेटा म्हणतो
आपण सुंदर
जग हे सुंदर
विचार जनांचे
विचार मनाचे
रुचेल त्याला मोठा म्हणतो
मी माझ्या छंदातच रमतो
मी हा माझा छंदच म्हणतो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा