चोवीस तास फेसबुकावर -



चिंता एक सतावत आहे
मुलगी माझी उपवर आहे

हुंडा मागणारा चालेल
गाडी नसणारा चालेल

पोटापुरता कमावणारा
नोटासाठी ना झुरणारा

आय टी वालाही नको
फायटी वालाही नको

स्वैपाकातहि रमणारा
हौस मुलीची पुरवणारा

असा नवरा तिला हवा
असा कुठे मी शोधावा

कारण माझ्या डोकेदुखीची
एकच अट आहे तिची...

' - चोवीस तास फेसबुकावर
कायम व्हावा तिचाच वावर !'

२ टिप्पण्या:

  1. फेसबुक ही सोशल साईट नसून गैरसोयीच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून बरळत रहाण्याची सोय आहे.

    उत्तर द्याहटवा