(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)
अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||
रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|
हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|
...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|
.
apratim ... aapale naav jar kavine lihale tar uttam hoyeel
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवाअप्रतिम विडंबन! खूप मनापासून आवडलं!
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवा