वृत्त- आनंदकंद
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा
मात्रा- २४
-------------------------------------------------
संसार हा सुखाचा दोघात चाललेला पत्नी मुकी मनाशी संवाद साधनेला-
मी कुंपणावरी त्या ठेवू कसा भरोसा
शेतास खाउनीया ज्यानेच घात केला-
का सापळ्यात आला उपदेशतो सभेला
नादात तोच नेता मोहात लालचेला -
थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता
निवडून तोच येतो मतदार भारलेला -
भजनात आळवीतो भावात देव आहे
बाजार का न पटतो तो भाव वाढलेला-
. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा