बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा .. [गझल]

वृत्त- कालगंगा 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
------------------------------------------------------
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा  
दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा..   

जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही    
जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा..

ना कळे देवास कैसी मुकुटचोरी जाहली 
सर्वज्ञानी तोच म्हणतो आंधळा मी हा कसा..   

मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी   
पण भिकारी पाहता का कोरडा पडतो घसा.. 

श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला
राव असता मान होता आदबीने या बसा ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा