( चाल: तोच चंद्रमा नभात )
तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !
खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !
सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !
त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !
(पूर्व प्रसिद्धी - शब्द गाssरवा २०११ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा