'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'
मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !
मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !
एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !
मस्त .. आवडली कविता !
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद !
हटवा