(चाल: बाई माझी, करंगळी मोडली)
ऐन दुपारी, नमुना फेरी,
गाडी नवी काढली - काढली
बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ ||
झणी मारून मी कट वळताना
कुठून अचानक आला श्वान हा गुपचुप येऊन, पाठीमागून
माझी साडी ओढली || बाई माझी ...
समोर भुंके कसा आडवा
पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा-
मी ओरडले, तिथेच पडले,
उठताना मोडली || बाई माझी ...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा