'विठ्ठल, विठ्ठल' - स्वर कानी आले
दर्शनास मोहित, मन माझे झाले !
पंढरीची वाट धरता मी थेट
वारकरी माझे आप्तजन झाले !
चंद्रभागी स्नान, देता अर्घ्यदान
पापाचे क्षालन देहाचे या झाले !
कामात विठ्ठल - नामात विठ्ठल
ध्यानात विठ्ठल - अती भ्रम झाले !
टाळ चिपळ्यात गुंतले दो कर
मनी नामस्मरण माऊलीचे झाले !
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल
अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा