चिमणे चिमणे दार उघड, म्हणत कावळा थांबत होता
बाळाला तीट लावत लावत.. चिमणीचा वेळ जात होता
शेणा-मेणाच्या त्यांच्या घरात पाऊस दंगा करत होता
बाळ मजेत आईच्या कुशीत, रंगीत स्वप्नात शिरत होता !
..पावसाची वाट पहात पहात, चिमणी खूपच थकली आहे
दाराबाहेरच्या कावळ्याने, मान बाजूला टाकली आहे
जुनी गोष्ट..नव्या पिढीतली आई बाळाला सांगत आहे
बाबाचा जीव सिमेंटच्या घरांत वरखाली टांगत आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा