त्या देवळातल्या देवाशपथ खरं सांगतो !
फक्त आणि फक्त,
त्या देवळातल्या देवाला मनापासून नमस्कार करण्यापुरता म्हणूनच,
परवा एक देवळात गेलो होतो.
प्रवेशद्वारापासूनच,
निरनिराळ्या सूचनांच्या पाट्यांची सुरुवात झाली होती .
नमस्कार " असा " करावा .
प्रदक्षिणा " अशी " घालावी..
रांगोळी " अशी " घालावी...
नामस्मरण " असे " करावे ....
ध्यान " असे " करावे.....
जेवणात " असे " पदार्थ वाढावेत ......
जेवण " असे " करावे.......
आणि बऱ्याच "अशा " सूचना लिहिलेल्या पाट्या, मी वाचत वाचत वाचत गेलो !
........... आणि सांगायची मुख्य गोष्ट म्हणजे,
देवळातल्या देवाला नमस्कार करायचेच विसरून, मी तसाच घरी आलो !
मग घरच्याच देवाला हात जोडून प्रार्थना केली -
" हे देवा, वेळात वेळ काढून, क्षणभर हात जोडून तुझे दर्शन घ्यायला, सर्वजण तुझ्या दारात येतात .
त्यातले जास्त भक्त दरिद्री , भुकेले, गरीब लोकच असतात.
ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते- असेही गरजू आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी, तुझ्या पायाशी धाव घेतात.
" असे तसे करावे " - अशा पाट्या नुसत्या वाचून, एकाचे तरी पोट भरत असेल का ... ?
पंचपक्वान्नाने भरलेले ताट गरीबाना न दाखवता -
हे " पाट्याचे स्तोम " आवरण्याची सद्बुद्धी त्या संबंधितांना दे ! "
.
.
bhivu nakos mi tuzya pathishi aahe...
उत्तर द्याहटवाDhanyavaad aaplyaa pratisaadaasaathee .
उत्तर द्याहटवा