कविता आणि वाचक


रात्री अकरा वाजता,
तणतणत, येरझाऱ्या घालत,
बायको स्वत:शीच बडबडत होती-
" माझ्या कवितेला... 

आज एकही प्रतिसाद नाही... 
म्हणजे अतीच झालं... ! " वगैरे वगैरे ...

बायकोचं बोलण माझ्या कानावर पडलं. 

समजावणीच्या स्वरात मी तिला म्हणालो,
" जाऊ दे ना.
अग, इतकं कशाला मनाला लावून घेतेस ?
खरं तर,

 कुणाला कवितेतलं काही कळत नस्त -
तरी पण कळल्यासारखे दाखवणारे,
 बरेचजण  असतात ! 

आपल्याला खरेच कवितेतलं कळत नाही,
हे कळणारे समजूतदार असे वाचक,
 कविता वाचण्याच्या भानगडीच्या  वाटेला जातच  नसतात ;

आणि तुझी कविता वाचण्याचा,

 जे वाचक प्रयत्न करणार.....
त्यानाही ती,

 "तुझ्यासारखीच" कळत नसणार !

मला सांग-
कसा काय मिळणार तुझ्या कवितेला प्रतिसाद ? "


.     .     .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा