ज्याचे जळते त्यालाच कळते !


परमेश्वरा,

आमच्या देशाच्या मंत्रीमंडळातल्या

 एकाही मंत्र्यांपैकी,
 कुणाचेही नातेवाईक, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रमंडळी सैन्यात नाहीत कारे ?

जर असतेच तर............

परवा ज्या दोन जवानांची निर्घृण हत्या,
सीमेवरच्या नापाक पाक सैनिकांनी केली, 
त्यांच्याबद्दल दोन शब्द तरी,

 तोंडातून उस्फूर्तपणे बाहेर काढले असते ना ?
दोन अश्रू तरी,

त्यांच्या  डोळ्यांतून बाहेर टपकले असते ना ?

पण नाही .....!

सीमेवरच्या जवानांशी,

 ह्या निर्लज्ज, बेशरम मंत्रीमंडळाला काहीच देणे घेणे नाही !

एकाही महाभागाने दु:ख व्यक्त केल्याचे,
किंवा त्या महाभागाला वाईट वाटल्याचे,
कुठेही जाणवले नाही !

नुसता निषेध खलिता ....

निषेध खलिता आणि..
 निषेध खलिता !

खरे तर आमच्या मनात नाही ,
तरी पण सद्यस्थितीच अशी वाटत आहे की ,


ह्या मंत्र्यांपैकी कुणाचा तरी जवळचा असा-
त्या पाकड्यांच्या तावडीत सापडावा !

 आणि....
त्याचे त्यांनी अमानुष हाल हाल करावेत !!!

कारण त्याशिवाय,

 कोणत्याही मंत्र्याला,
खडबडून जाग येईल असे वाटत नाही ...


आणि लगेच बघा.........

 कशी झाडून  सगळी सरकारी यंत्रणा धडपडून,
कामाला जुंपली जाईल !

शेवटी काय,

 ज्याचे जळते त्यालाच कळते !

.     .     .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा