पुणे -


.
पुणे - (१)

 

कधीकाळी त्या सुशिक्षितांच्या-  सुसंस्कृत-  सुसंस्कारित अशा 
 पुण्यात तुम्ही गेला,
तर एखादा

"शहर-बस-थांबा " 
न विचारता कसा ओळखाल ?

थांबा,

कुणालाही विचारण्याची गरजच नाही !

रस्त्याच्या पार मधोमध-

 पोरापोरींचे वेडेवाकडे
 इतस्तत: पसरलेले घोळके-
 

त्यांच्या मागे, 
रस्त्याच्या कडेला जीव मुठीत धरून उभे-
 भेदरलेले, छत्रीधारी, स्वेटरवाले ज्येष्ठ स्त्रीपुरुष -
 

हे सर्व एकाच दिशेला माना वळवून वळवून,
 बघताना दिसले की,
समजायचे.....

 तो पुण्यातला "बसचा थांबा" आहे.


.     .     .


पुणे - (२)

 

आपण नक्की त्या सुप्रसिद्ध पुण्यातच आहोत का ...?

हे जाणून घेण्यासाठी,

कुठल्याही चौकात,
वाहतुकीच्या दिव्यापाशी थांबा :

हिरवा दिवा जाऊन...........,

लाल दिवा लागलेला असतांनाही--------,
पोलिसांनाच नाही,

 तर त्यांच्या बापालाही न जुमानता,
सुसाट दुचाक्या हाकणारी,
चांगल्या घरातली,
सुशिक्षित वाटणारी पोरं-पोरी दिसली ... की,
समजावे- - - -

आपण नक्कीच त्या "विद्येच्या माहेरघरी" पोचलो आहोत !
आणि .........
हीच पोरं-पोरी,
आपल्याला कुठे नं कुठे तरी धडक देऊन,
पुण्यातल्या ओंकारेश्वरी पोचविणारी आहेत ! 


.     .     . 


पुणे - (३)

 


पुण्यातल्या दुचाकीस्वारासारखे..
 तरुण सुशिक्षित दुचाकीस्वार
इतर कुठल्याच शहरात शोधूनही,
पहायला मिळणारच नाहीत !

दुचाकीवर पुढे अर्थातच मुलगा असतो,
त्याच्यामागे मुलगी बसलेली असते.

मुलीला वाटत असावे की,
मुलगा नेहमी दुचाकी चालवताना-
जणु काही,

 पुढे तोंडावर आपटणारच आहे आता .....,

म्हणून ती मुलगी,

 त्या मुलाच्या कानाशी सूचना देत,
आपल्या दोन्ही हातांनी,
  आपल्या मायेने कायम,

 पोटाशी घट्ट कवटाळूनच,
बसलेली दिसते !


.     .     .

४ टिप्पण्या: