फुकटचा मोलाचा विचार


दुपारी चहापान झाल्यानंतर,
निवांतपणे घराच्या छताकडे पहात,
खुर्चीत बसलो होतो.

सुपारीची पूड घेऊन आलेली बायको,

 माझ्या तंद्रीकडे पहात, म्हणाली -
" काय हो, कसला विचार करताय एवढा ? "

मी उत्तरलो ;
" एक नेकलेस, दोन पाटल्या , तीन अंगठ्या.......

 विचार करतोय आणि ..."

माझे वाक्य अर्ध्यावर तोडत बायको चित्कारली -
" अय्या खरंच मज्जा आहे ना -

संक्रांत जोरातच  आहे की मग आपली ! "

मी तिच्याकडे पहात म्हणालो -
" अग शहाणे, 

मी विचार करतोय म्हटले आहे -
ते आणायचे म्हणालो नाही मी . 

लक्ष आहे ना ?
  नुसता विचारच करायला पैसे पडत नाहीत काही ! "


.     .    .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा