विसराळू कोण ?


परवा अचानक पाऊस पडायला लागला..........
काही वेळाने पाऊस थांबला .
बायको बसमधून उतरून,
डोक्यावर (-आपल्या) हात फिरवत,
रागारागाने तरातरा पुढे निघून गेली.

मी हातात दोन छत्र्या सांभाळत,

 निवांतपणे घरांत शिरलो.

बायकोवर विजयी मुद्रेने गरजलो -
" मला 'विसराळू' म्हणून चिडवायची,

 एकही संधी सोडत नाहीस ना ?
... हा बघ तुझा वेंधळेपणा ! 

बसमधेच तू विसरलेली ही छत्री !
आणि हो, 

बसमधून सांभाळून आणलेली ही माझी !
दोघांच्याही ह्या छत्र्या.....पाहिल्यास का ?

 कशा आठवणीने आणल्यायत  मी ? "

बायको दुप्पट घुश्शाने उसळून म्हणाली, 

" अहो स्मरणशक्तीचे प्रोफेसर !
कुणाचा वेंधळेपणा आहे, नीट बघा जरा !
म्हटलं भर पावसात आज आपण दोघेही बिनछत्रीचेच मिरवलोत.
त्या पहा....

 खुंटाळ्याला टांगलेल्या आपल्या दोन्ही छत्र्या...
इथं घरांतच आहेत ! 


.    .    .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा