इकडून एक दगड फेकला
तिकडून दगड वर्षाव आला
दगडालाही भाव आहे
दगडापासून भिती आहे
दगडाने डोके फोडतात
दगडातून देव घडवतात
दगड हाताळावा तरी कसा
ज्याचा त्याचा प्रश्न तसा
वेळेवर फेकला- जीत आहे
वेळ गेल्यावर- फजीत आहे
दगडात शहाणपणा नसतो
फेकणाऱ्यात नक्कीच असतो
दगडांची इमारत का बांधायची
दगडांची नुसती रास का रचायची
दगडा दगडाची गोष्ट फळली
दगड नसेल त्यालाच कळली !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा