घुसला रे, घुसला रे
राजकारणी व्हायरस घुसला रे ...
दिसला रे, दिसला रे
पांढरा टोपीवाला दिसला रे ...
हसला रे, हसला रे
टोपीवाला माणूस हसला रे ...
डसला रे, डसला रे
आश्वासनातून डसला रे ...
फसला रे, फसला रे
सामान्य मतदार फसला रे ...
बसला रे, बसला रे
गेंड्याच्या कातडीत बसला रे ...
घुसला रे, घुसला रे
सत्तेच्या पदात घुसला रे ...
कसला रे, कसला रे
खुर्चीच्या नादात नासला रे ...!
.
कवीता,
उत्तर द्याहटवाभाववेड्या मनाची साद आहे.
म्हणतील कुणी हा खुळा नाद आहे.
माझ्या 'मी' शी एकांकी संवाद आहे.
गुढगुंफन सहजीवनाची
फिर्याद आहे.
हो! प्रत्येकात एक कवी
निर्विवाद आहे..
कवीमन जपण्यात अनोखा
आनंद आहे
प्रमु.ईवरकर ८.९.९८
डॉक्टरसाहेब ,
हटवाब्लॉगला भेट दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !