१) कवितेचा उगम -
मनाचा घडा भरला अन्
चांगले विचार वाहू लागले -
लोक वाहत्या प्रवाहाला
छान कविता म्हणू लागले !
.
२) सुखाचे वारे -
भयकंपित मी कधी किती
सुखाचे वारे वाहताना ,
अडविण्यास टपलेले किती
बहुत जन ते पाहताना !
.
३) स्मित अन् हुंदका -
एक कवडसा तुझ्या स्मिताचा
खेळीमेळीत माझे विश्व -
नाद तुझ्या अस्फुट हुंदक्याचा
डळमळीत सारे विश्व !
.
४) आनंद -
दुष्काळी वातावरण खिन्न
अन् अचानक आलेला पाऊस -
तुझ्या भेटीसाठी मी सुन्न
अन् अचानक अशी आलेली तू !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा