अरे बिल्डर बिल्डर
किती फोडशी डोंगर -
वनराई जाई वाया
निसर्गाचा रे जागर !
अरे बिल्डर बिल्डर
किती तुझा अविचार ,
पैशापायी हकनाक
बळी घेशी रे हजार !
अरे बिल्डर बिल्डर
किती झालास नीडर ;
जीव गेले हकनाक
तुझा तोरा तरीही झ्याक !
अरे बिल्डर बिल्डर
एखादा करी विचार ....
सर्व सोयी पाहुनिया
खूष ग्राहक होणार !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा