- मन माझे हे, किति रमले हो,त्या दत्तगुरुस पाहून होहे अघटित घडले कैसे हो ।।
त्रिशूळ धरुनी एक कराने, चक्र दुजा हाती धरिले,कमंडलूसी एका हाती, शंखा करि दुस-या धरिले,त्या कमळासी धरि बोटात, ती गदा उभी थाटात हो ।।भाव मुखावर सात्विक पाहुन, हरपून गेले भान हो,त्रिमुखासह कर सहा ते पाहुन, डोळे गेले दिपून हो,ती पाठीशी उभी गाय अशी जणु भार जगाचा पेलुन हो ।।चार वेद ते उभे समोरी श्वानांच्या रूपात पहा,राजस मुद्रा पहात गुरुची बनले शांतीदूत पहा,पदकमलांवरी शिर झुकवुनिया करु वंदन त्रैमूर्तीस हो ।।
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा