शहरी प्रेम तुमचं.. ग्रामीण प्रेम आमचं
एकाच फूटपट्टीवर सांगा कसं मोजायचं ...
तुमचं प्रेम शहरी, दिखाऊ असतं
आमचं प्रेम ग्रामीण, मनातच ठसतं ...
तुमच प्रेम दिसत फिरत्या फुलपाखरावानी
आमचं प्रेम असत चिकट्या गोचिडावानी ...
गुलाबाच्या बागेमध्ये तुमचं प्रेम दंगतं
उसाच्याच फडामध्ये आमचं प्रेम रंगतं ...
वरवरच्या सौंदर्याला तुमचं प्रेम फसतं
घरं पाडत काळजाला आमचं प्रेम घुसतं ...
साध्या साध्या कारणामुळे कुरकुर तुमच्या प्रेमात
एक घाव दोन तुकडे, कुर्हाड आमच्या प्रेमात ...
प्रेम तुमचं वाढत कुंडीतल्या बोन्सायएवढ
प्रेम आमचं वाढत शेतातल्या चिंचेएवढ ...
गाता प्रेमगाणी तुम्ही येताजाता इलू इलू
लावणी आणि तोडणीत आमच प्रेम गुलूगुलू ...
प्रेम तुमचं फुलतं शरीराच्या रंगावर
प्रेम आमचं डुलतं रापलेल्या अंगावर ...
तुमचे प्रेम दोघांचे कुरवाळत हात हातात
आमचे प्रेम जोडीने कष्ट करत शेतात...
प्रेम तुमचं सवंग गाडीवरचं पिज्झा बरगर
प्रेम आमचं खमंग तव्यावरचं पिठलं भाकर ...
चॉकलेट नि आईस्क्रिमात तुमचं प्रेम जमतं
तिखट मिर्चीच्या ठेच्यात आमचं प्रेम रमतं
पंचतारांकित हॉटेलवानी आसल तुमचं प्रेम
लई भारी ढाब्यापेक्षा हाय मोठ्ठ आमचं प्रेम ...
तुमच्या प्रेमात कधीकधी उडे बार फुसका
आमच्या प्रेमात मधीमधी गावरान हिसका...
राजाराणीची असते तुमच्या प्रेमात गोडी
धनीकारभारनीची बनते आमची प्रेमात जोडी ...
शहरी प्रेमात उरते शेवटी काडीमोड
ग्रामीण प्रेमात पुरते एक तडजोड ...
शहरी प्रेम लहरी नक्की कुणावर असतं
आज हिच्यावर बसतं उद्या तिच्यावर दिसतं ...
येकाच पतिव्रतेवर ग्रामीण प्रेम बसतं
त्याच कारभारनीमुळं खोपट सगळं हसतं ...
.
एकाच फूटपट्टीवर सांगा कसं मोजायचं ...
तुमचं प्रेम शहरी, दिखाऊ असतं
आमचं प्रेम ग्रामीण, मनातच ठसतं ...
तुमच प्रेम दिसत फिरत्या फुलपाखरावानी
आमचं प्रेम असत चिकट्या गोचिडावानी ...
गुलाबाच्या बागेमध्ये तुमचं प्रेम दंगतं
उसाच्याच फडामध्ये आमचं प्रेम रंगतं ...
वरवरच्या सौंदर्याला तुमचं प्रेम फसतं
घरं पाडत काळजाला आमचं प्रेम घुसतं ...
साध्या साध्या कारणामुळे कुरकुर तुमच्या प्रेमात
एक घाव दोन तुकडे, कुर्हाड आमच्या प्रेमात ...
प्रेम तुमचं वाढत कुंडीतल्या बोन्सायएवढ
प्रेम आमचं वाढत शेतातल्या चिंचेएवढ ...
गाता प्रेमगाणी तुम्ही येताजाता इलू इलू
लावणी आणि तोडणीत आमच प्रेम गुलूगुलू ...
प्रेम तुमचं फुलतं शरीराच्या रंगावर
प्रेम आमचं डुलतं रापलेल्या अंगावर ...
तुमचे प्रेम दोघांचे कुरवाळत हात हातात
आमचे प्रेम जोडीने कष्ट करत शेतात...
प्रेम तुमचं सवंग गाडीवरचं पिज्झा बरगर
प्रेम आमचं खमंग तव्यावरचं पिठलं भाकर ...
चॉकलेट नि आईस्क्रिमात तुमचं प्रेम जमतं
तिखट मिर्चीच्या ठेच्यात आमचं प्रेम रमतं
पंचतारांकित हॉटेलवानी आसल तुमचं प्रेम
लई भारी ढाब्यापेक्षा हाय मोठ्ठ आमचं प्रेम ...
तुमच्या प्रेमात कधीकधी उडे बार फुसका
आमच्या प्रेमात मधीमधी गावरान हिसका...
राजाराणीची असते तुमच्या प्रेमात गोडी
धनीकारभारनीची बनते आमची प्रेमात जोडी ...
शहरी प्रेमात उरते शेवटी काडीमोड
ग्रामीण प्रेमात पुरते एक तडजोड ...
शहरी प्रेम लहरी नक्की कुणावर असतं
आज हिच्यावर बसतं उद्या तिच्यावर दिसतं ...
येकाच पतिव्रतेवर ग्रामीण प्रेम बसतं
त्याच कारभारनीमुळं खोपट सगळं हसतं ...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा