हुश्श !
सगळी तयारी झाली "दिवाळी-गिफ्ट"ची .
दिवाळीचे सर्व प्रकारचे गोड, तिखट, आंबटगोड पदार्थ..
पाचपन्नास क्यारीब्यागा भरून झाल्या .
तयार होऊन,
आता नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे निघण्यासाठी दाराबाहेर पाउल टाकतो न टाकतो, तोच -
नेहमीचा परिचित उद्गार कानावर आला,
" सगळच मुसळ केरात ! "
साहजिकच मी आश्चर्याने मागे वळलो .....
बायकोने विचारले -
" अहो, थांबता का दोन मिनिट ? "
मी होकारार्थी मान डोलावताच,
घाईघाईत ती स्वैपाकघरात जाऊन,
परत बाहेर दाराशी आली ...
तिच्या हातात दिसत होत्या -
"दोन दोन कांदे" असलेल्या छोट्याछोट्या प्लास्टिकच्या पिशव्या !
मोठ्या उत्साहाने ती मला म्हणाली,
"हं , प्रत्येक क्यारीब्यागमधे ह्यातली एकेक पिशवी टाका बरं पटपट.
विसरलेच होते मी ! "
तिच्या चेहऱ्यावरचे "कृतकृत्य" झाल्याचे भाव निरखत....
मी दारातच थबकलो होतो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा