'बैल गेला नि खोपा केला -'



दिवाळी आली आली म्हणता म्हणता,
अगदी उंबऱ्यावर येऊन ठेपली की हो - 

दिवाळी आली म्हटल्यावर,
पोरं फटाके बॉम्ब आणायची घाई करणारच ना ?

लगेच माझ्यामागे बायकोचे टुमणे -
"ते फटाके नको हो,
ते बॉम्ब नको हो"
सुरू झाले .

कारण काय तर -
सर्वांच्या "कानठळ्या" बसून,
कायमचे बहिरे होण्याची भयंकर भीती असते... म्हणे !

अरारारारा...

इतकी वर्षे
बायकोचे उच्च रवातले बोलणे ऐकून ऐकून,
कानावरचे  अत्याचार सोसून,
आम्ही ठार बहिरे झाल्यावर ..

आता ह्या वयात-
आम्हाला बायको उपदेश करू लागली की हो !
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा