एकमेका साह्य करू -


काल संध्याकाळी दंतवैद्याचा मला फोन आला -


" 
धन्यवाद काकासाहेब, मी काही कारणाने सकाळी फराळाला तुमच्याघरी येऊ शकलो नाही ! "

त्यावर मी विचारले -
"
डॉक्टरसाहेब, त्यात आभार मानण्यासारखे काय विशेष आहे ? "

फोनवर हसत हसत ते उद्गारले -
" काय सांगू तुम्हाला काकासाहेब,
अहो, आत्ता दवाखाना उघडल्यापासून,
ही भलीमोठी रांग लागली आहे इथे !
सगळे दातदुखीग्रस्त पेशंट उभे आहेत, 
..सकाळी तुमच्याकडे लाडू आणि चकलीचा फराळ करून आलेले ! "
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा