दिवाळी आली की .....
ऐन दिवाळीत
लेकी सुना भगिनी पत्नी यांच्या प्रेमममताभावनेला
अगदी ऊत आला होता खरा-
अंघोळीला कढत कढत पाणी काय,
सुगंधी उटणी काय,
सुगंधी साबण काय,
सुवासिक तेल काय,
अंग रगडून रगडून न्हाऊ-माखू घालणे काय ....
अभ्यंग स्नानानंतर यथेच्छ फराळाचा आग्रह तरी किती तो -
कश्शाची म्हणून कमतरता नव्हती हो !
दिवाळीतला पाडवा
दिवाळीतली भाऊबीज
" हक्काची ओवाळणी - "
दिवाळी संपली आणि -
आमचे कोडकौतुकही संपले !
दोन दिवस झाले .....
अंघोळ झाली का ?
अंघोळ केली का ?
.........म्हणून विचारायलाही...
कुणी तोंड उघडले नाही हो आतापर्यंत !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा