बायको साडीला राजी

बायको दाणकन आपले धूड आणि बूड सोफ्यावर आदळत,

भाज्यांच्या पिशव्या बाजूला टेकवत,
हाश्शहुश्श करत उद्गारली-
" बै बै बै... हे आपले चार जिने खाली उतरून,

वर चढून जायचेयायचे म्हणजे अगदी अग्नीदिव्यच आहे बै !
तेवढा फ्यान सुरू करता का हो ? "

होकारार्थी मुंडी हलवत,
तिचाही मी फ्यान असल्यामुळे,

लगेच डोक्यावरचा फ्यान चालू करत म्हणालो -
" अग, आज दिवाळीसाठी साडीखरेदीला जायचं ठरल होतं ना आपलं ! "

क्षणार्धात-

ती सोफ्यावरून टुण्णकरून उडी मारत,

अपूर्व उत्साहाने चित्कारली -
" विसरलेच होते की मी ह्या भाजीच्या नादात ..
बसलात काय असे मग उगीच ! चला की हो पटकन..,
तयार होऊन आले हं मी दोन मिनिटातच ! "

मघाची ती दमलेली बायको खरी का,
ही आताची उत्साही खरी...
असा विचार मी मनात करीपर्यंत ,
ती फ्रेश होऊन-

" हं चला ".....

म्हणत माझ्यासमोर हजर !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा