तो बाहेर घाईघाईत निघाला होता.
आपल्या दारासमोरच,
"डावीकडच्या शेजाऱ्या"चा केरकचरा
फिरतफिरत आलेला पाहून,
त्याचेही डोके फिरले.
तो पुटपुटला -
"किती निगरगट्टआणि निर्लज्ज लोक आहेत हे !
आपल्या
घरातला केरकचरा दुसऱ्याच्या दारात ढकलताना,
काहीच कसे वाटत नाही ह्यांना !"
आधीच उशीर झालेला..
रागारागाने इकडेतिकडे पहात-
त्याने तो केरकचरा...
"उजवीकडच्या शेजाऱ्या"च्या दारात ढकलला.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा