आजकाल.....
भिंतीवर घड्याळ नसते
अचानक / कधीतरी वेळ पाहण्यासाठी
भिंतीवर क्यालेंडर नसते
तारीख / वार / तिथी पाहण्यासाठी
भिंतीवर आदरणीय नेता नसतो
घरात प्रवेशल्यावर स्वागतासाठी
भिंतीवर देवाचा / देवीचा फोटो नसतो
मस्तक झुकवून वंदन करण्यासाठी
भिंतीवर सुविचार टांगलेला / लिहिलेला नसतो
गृहस्थाचे मन वाचण्यासाठी
खिळा ठोकलेला नसतो
माणसापेक्षा पॉश भिंतीला जपण्यासाठी
कोनाडा भिंतीत नसतो
सांजदिवा मिणमिणण्यासाठी !
आजकाल......
घराला भिंती असतात
कोऱ्याकरकरीत अंत:करणासाठी
घरोघरी दिसते ती फक्त
टीव्ही / कॉम्प्युटर / फेस्बुकाचीच भिंत
भिंत असते फक्त
घरात डोके आपटण्यासाठी
चार भिंतींच्या घरात
ना कुणी बोलण्यासाठी, ना स्वागतासाठी
भिंतीबाहेरच पाहुणा
ताटकळणार आदरातिथ्यासाठी ....
.
chhanach.
उत्तर द्याहटवाAmeya -
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे .