फेसबुकमाहात्म्य... तो ......आणि आत्मचिंतन -


घरी अभ्यास मन लावून केला नाही
शाळेत नंबर वर आणला नाही
वर्गात मॉनेटर होऊ शकला नाही
बायकोवर डाफरल्याशिवाय दिवस गेला नाही
स्वत: एकही नोकरी टिकवू शकला नाही
नोकरीत काम कधी नीट जमले नाही
बॉससमोर तत पप शिवाय बोलला नाही
कुणाला मदत कधी करायला गेला नाही
गल्लीत शेजारीपाजारी हिंडला नाही
चारचौघात ओळख देऊ शकला नाही
समाजात कधी मिसळला नाही
सोसायटीत कधी निवडून येऊ शकला नाही ...

फेसबुकाचे फुकट व्यासपीठ मिळाल्याबरोबर मात्र -

तो शहाणा-
सगळ्या जगालाच,
त्या अरविंद केजरीवालने -
"असे करायला पाहिजे होते..."

 "तसे वागायला पाहिजे होते...."
असे छातीठोकपणे सांगत सुटतो !
.

४ टिप्पण्या:

  1. ..
    "बरे मग आता लोकं कुठे तसे म्हणत आहेत .. ते तर म्हणत आहेत कि .. केजरीवाल ने असे वागायला नको होते .. असे करायला नको होते .. लोकांना फसवायला नको होते .. रणांगणातून (योघ्याच्या आव आनेलेल्या योध्याने) पळून जायला नको होते .. हेच त्याला आता सांगणे बाकी आहे .. !!
    ..
    केजरीवाल चे गुणगान गायले तर एकाच गोष्टीचे संस्कार आपण मुलांवर करू ते म्हणजे .. मुलांची शपथ घेवून .. सुद्धा .. ती मोडून .. संसार (सत्ता) थाटायचा आणि तो नंतर देशाची शपथ घेवून मोडायचा .. !!
    ..
    सतीश सुर्वे

    उत्तर द्याहटवा
  2. सतीश जी ,
    एकदम अशीच वस्तुस्थिती आहे आता.. सरडा वेळेवर पळ काढण्यात, रं
    ग बदलण्यात प्रवीण आहे .
    प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

    उत्तर द्याहटवा