ये रे माझ्या मागल्या -


सकाळी सकाळीच बायकोने माझ्या तोंडावरचे पांघरूण खसकन ओढले -

काहीही हालचाल न करता,
मी तसाच निवांत पडून राहिलो ...

कालच्याच तारस्वरात बेंबीच्या देठापासून गरजत ती ओरडली -
"अहो, पसरलात काय इतका वेळ ?
नाष्टा नाही तर नाही....
आज चहाची पण तयारी अजून केलीच नाही का ? "

पांघरूणातून डोके बाहेर काढत,
मी डोक्याखाली दोन्ही हात ठेवून शांतपणे उत्तरलो -

" उगाच डाफरायच काम नाही हं !
कालच्या विशेष दिनानिमित्त,
मी तुला दिवसभर डोक्यावर घेऊन नाचलो-
म्हणून आजही तसेच करीन वाटले का !
नीट ध्यानात ठेव.. आता एकदम पुढचाच आठ मार्च ! "

- पुन्हा मी एकटा पांघरुणात गडप !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा