होऊ कसा उतराई -


आजच्या विशेष  महिलादिनी
तुझ्यासाठी मी आपणहून
चहाचे पातेले
ग्यासवर चढवताना -

तुझ्याशी वर्षात एकदा
आज मोकळ्याढाकळ्या
गप्पा मारता मारताना ....

तुझ्या ष्टाईलने
ऐटीत पातेले पट्कन
खाली उतरवताना ..

चुकून नकळत
स्स्सस्स्सsssss आवाज
माझ्या तोंडातून बाहेर पडताना -

जोरदार चटका
माझ्या बोटांना
.... आणि तुझ्या डोळ्यात
पाणी घळघळ पाहताना .. !

शब्दच अपुरे आहेत ग -
व्यक्त कसा मी होऊ !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा