वरात


सात पावलांची साथ
जन्मजन्मांची गाठ

एकमेकांची समजूत
संकटात एकजूट

हेवेदावे ना कधीच
ईर्ष्याद्वेष ना कधीच

रुसवेफुगवे ग क्षणांचे
एकमेकांत गुंतण्याचे

तुझ्या डोळ्यातले पाणी
माझ्या मनाला टोचणी

माझे कष्ट उपसणे
तुझे पाठीशी राहणे

हृदय माझ्या शरीरात
प्राणवायूच तुझी साथ

हात धरला हातात
सुखदु:खांची वरात . . !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा