"स्टेटस" जरी टाकला आपण फक्त एक
"वॉल" ती असावी आपली नित्य नेक |
"लाईक" मिळाले जरी फक्त दोन
बदलू नये आपुला कधी दृष्टीकोन |
"कॉमेंट" मिळाल्या जरी मस्त तीन
इतरांना समजू नये तरी हीन-दीन |
"शेअर" झाले जरी "पोस्ट"चे चार
जाऊ नये माजून तयाने हो फार |
"ट्याग" जरी दिसले "वॉल"वर पाच
थयथयाट नको, नको नंगानाच |
"कॉपीपेस्ट" केले इतरांनी सहा
समजावोनी सांगावे तयाना पहा |
"अन्फ्रेंड" झाले जरी चुकून सात
पुन्हा "फ्रेंडरिक्वेस्ट" पाठवावी आत |
"मेसेज" आपल्याला दिसले जरी आठ
आवडीचे तेवढे करावे त्यात "च्याट" |
"ग्रुप" जरी दिसले "वॉल"वर नऊ
करू नये- दातओठ गिळू की खाऊ |
"गेम-रिक्वेस्ट" जरी नित्य येती दहा
आवडीचा भिडू त्यात निवडून पहा |
"पोक" आपल्याला मिळाले हो अकरा
चकरा मारून शोधावा आपणही बकरा |
"फेसबुका"त नका वाजवू कधी बारा
आपलेच होतील नक्की तीन तेरा |
.
Mast :)
उत्तर द्याहटवाअमोल ,
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद !