आयुष्याची रहस्यकथा -


अडचणींचे थोडेफार शब्द
विखुरलेला पूर्वार्ध संकटानी
गूढ अनाकलनीय प्रसंग
असंख्य वर्णने पानोपानी . .

माझ्या आयुष्याची रहस्यकथा
लिहून ठेवलीय विधात्याने,
पाच सात पाने दु:खांची
एखादा परिच्छेद भारला सुखाने . .

चाळत बसलो आहे उत्तरार्ध
हाताळलेलीच जीर्ण पाने -
पुस्तक थरथरत आहे ;
वाचणार शेवट अधीरतेने ..

शेवट आधीच कळू नये..
जबरदस्त रहस्यकथालेखन आहे
कलाटणी देण्यासाठी अर्धे पान
शेवटी कोरेच सोडलेले आहे . . !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा