खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -
चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -
बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -
बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .
.
chhan
उत्तर द्याहटवाधीरज,
हटवाआपल्या प्रतिसादाबद्दल आभार !