तुझ्या डोळ्यांच्या डोहात -


पहात राहिलो खोलवर
तुझ्या डोळ्यांच्या डोहात
भिजू लागले एकेक अक्षर
घुमू लागला नाद शब्दात ..

नादात उमटले प्रतिबिंब
माझ्या डोळ्यात गहिरे
शब्दांतून बनली कविता
रूपरंग घेऊन साजिरे ..

लकाकू लागले तुझे डोळे
हलू लागले माझे प्रतिबिंब
कवितेची प्रतिमा खोलखोल
डोहात थिजली भिजून चिंब
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा