तीन व्रात्यटिका


१)  अबोला -

नाही मी जर ऐकले तिचे
बायको अबोला धरणार आहे -
अबोल्यातल्या 'नियम अटी'
रोज मी दिसभर ऐकणार आहे !
.
 
 
२) आधुनिक-

मी लिहिलेले अभंग माझ्यासमोर
बायकोने हौदात बुडव बुडव बुडवले -
झेरॉक्स कॉपीज होत्या म्हणून
मी बायकोला अजिबात नाही अडवले !
.

३)  दर्शन-

आज चतुर्थी आहे म्हणजे
देवळात ती असणार आहे -
निघावे म्हणतो देवळाकडे
जमल्यास..देवदर्शन घेणार आहे !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा