मी सगळ्या जगाला विसरून,
नेहमीप्रमाणे संगणकात तोंड खुपसून बसलो होतो.
तरीपण,
बायको इकडेतिकडे घाईघाईत येरझाऱ्या घालत होती,
त्यामुळे माझे लक्ष थोडेफार विचलीत होतच होते.
शेवटी न राहवून मी तिला हटकलेच-
"अग, माझ्यापुढे का सारखीसारखी मिरवतेस अशी ?"
बायको क्षणभर थांबली आणि उत्तरली -
"अहो, 'स्मरणशक्ती कशी वाढवावी',
या विषयावर मी एक छानसा लेख सकाळी पेपरात वाचला होता.
मी त्याचे कात्रणही काढून ठेवले होते हो -
तुमचं संगणकावरच काम झाल की,
ते तुम्हाला द्यायच म्हणून !
पण मी ते कुठ ठेवलय -
हेच नेमक मला आता आठवेनासे झालेय !"
.
हा हा हा , मस्तच
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद, अमोल !